रणधुमाळी
ही कहानी जुन्नर तालुक्यातील उच्च समाजातील दोन घराण्यातील उच्च कोटीच्या वादातुन जन्माला आली. कहानीची मुळ पात्र मांडवी नदीच्या किनार्या लगत आप्पा साहेब घुले पाटील राहणार वरची आळी जुन्नर तालुका शिवनेरीच्या पायथ्याशी त्यांच्या सौ जिजा आई घुले पाटील दोघांना दोन मुलगे एक मुलगी थोरले बंधु सार्थक दादा साखर कारखाण्याची धुरा आणी आप्पा साहेबांच्या राजकीय वारसाचे प्रबळ दावेदार , संग्राम दादा शेती, काॅलेजच्या राजनिती मध्ये अग्रगणी. गायत्री ताई प्रेम हेच जिवन माननार्या वडिलांच्या गळ्यातला ताईत भावांचा जीव की प्राण आणी तळहातचा फोड. वडिलांचा एकही शब्द न पडु देणार्या ताई साहेब वडिलांचे कट्टर वैरी आणी राजकीय हितशत्रू असलेल्या रावसाहेबांच्या थोरल्या मुलाच्या प्रेमात घरदार सोडुन वडिलांच्या इभ्रतिची पर्वा न करता पळुन जाऊन लग्न करते. आप्पा साहेबांच्या राजकिय वर्तुळात भुकंप उठतो. सुत्र हलू लागतात. आप्पा साहेबांना हार पचनी पडत नसते. आपली इज्जत दुश्मनाच्या दाराशी गहान पाहुन तिळपापड होत असताना संग्राम दादा दुश्मनाच्या गोटात जाऊन ताईच्या नातेसंबंधा मध्ये जाऊन आपल्या वैरी गटाची दिशा ढाले पाटील या ...