तू आणि मी

 


आपली कहानी सुरु होते मुंबईच्या एका चाळीत एक स्वाती ची जी लहान पणा पासुनच लाडात वाढली
स्वाती मुंबई सारखी शहारत जन्माला आलेली असल्यामुले थोडी आधुनिक आणि लाडवलेली. वय 20
स्वाती चे वडील सुधाकर महानगर निगम मध्ये इलेक्ट्रीक विभाग मधे कामाला अतिशय प्रामाणिक आणि हुषार व्यक्‍तिमत्व आपल्‍या तीन मुलींची आणी एका मुलाची जबाबदारी लीलया पेलनारी व्‍यक्‍ती. वय 50
स्वातीची आई वीणा आदर्श गृहिणी कटकसर करुन पैसा जोडून ठेवणारी मुलाचं सुख शोधनारी एक सामान्य बाई.वय 45
स्वातीची बहिन राधिका अगदी साधीभोळी सरळ आईवडिलांच्या कायम आज्ञेत राहणारी अभ्यासु आणी परिक्षेत पहिली येणारी हुशार मुलगी आईवडिलांसाठी कायम कौतुकास पात्र.वय 22
स्वातीची दुसरी बहिन दामिनी लहान वयात आई वडिलांचा अभ्यासा सोबतच आधार आणी संसाराला हातभार लावणारी.
ह्या सगळ्यांत विरुद्ध व्यक्तिमत्व आणी शेंडेफळ असलेली आपली स्वाती.वय 21
स्वातीचा भाऊ राकेश खादाडखाऊ आणी आज्जीने लाडावलेला उनाड मुलगा वय 18
तर आपली कहाणी तिथे वळण घेते जेव्हा सुधाकर आपल्या आईच्या म्हणजेच आपल्या मालती आजीच्या आपल्या काळात स्वताःला माला सिन्हा समजणारी पण गुणाने ललिता पवार असलेल्या आईच्या हट्टाखातर आपल्या पदाचा पुर्व राजीनामा देत आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतो. वय 75
मुलींची जबाबदारी बायकोचं माहेर दुरावण्या अवस्थेची पर्वा न करत श्रावणबाळ कायमचं गावी राहण्याच्या उद्देशाने निघतो सहपरिवार.
ह्या कथानकाचं दुसर मुळपात्र म्हणजेच वैभव गावात वाढलेला चार भावंडात तीन नंबरचा आणी जेमतेम शिकलेला मुलगा घरची परिस्थिती तशी चांगली म्हणजे खाऊनपिऊन सुखी कुटुंब. वय 23
गावत आलेलं नवीन कुटुंब गावात सगळ्यांच आकर्षन आणि चर्चेचा विषय ठरते.
सुधाकर गावात आल्यावर आपल्या मुलिंना तिकडच राहणीमान आणी रहनसहन सगळ्याची कल्पना देतो. आणी त्याच्या अनुशासन शिस्तिचा धाक असलेल्या दामिनी आणी राधिका त्याच पालन सुद्धा करतात .
पण स्वातीच मन पाखरू होऊन सैरभैर धाऊ लागत.  नविन जागा नविन परिचय ह्या सगळ्याची ओढ असलेली स्वाती नकळत वैभव ला आदळते ती तर तिथुन निघुन जाते पण वैभव मात्र कायमचाच तिच्या पहिल्या नजरेच्या जाळ्यात अडकतो गुरफटतो .त्याची दिनचर्याच बदलुन जाते त्या दिवसापासुन तिच्या जाण्या येण्याचा वेळा राखणं स्वताःचा मार्ग बदलुन तिच्या आसपास घुटमळनं एका नजरे साठी बैचेन वैभव प्रेमात पुरा आकंठ बुडतो. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण तिच्या वडिलांचा धाक किंवा आदर त्याला व्यक्त व्हायला देतच नसत.
वैभवचा मित्र आणी परिवार वैभव ला पुरेपुर साथ देत त्याला प्रोत्साहन पण देत
पण तो असाच हळवा वन सायडेड लव स्टोरी जगत राहतो. त्यासाठी ती अख्ख जग होते पण तिच्यासाठी तो फक्त सामान्य असतो. तिला त्याच्या प्रेमाची जाणिव तर असते त्याच्या आसपास घुटमळण्याची सवय तर होते पण कशाची पर्वा न करणारी आणी स्वताच आयुष्य जगणार्या स्वातीला तो फक्त एक विरंगुळा असतो .तीला


Comments

Popular posts from this blog

Stop Dreaming Get Real series

Sit com - Kool Ghar Kool

At Crossroad ऽ “त्या” वळनावर ऽ