ॐ धैर्यमंगळ ॐ
समृद्धी साठे ब्राह्मण कुटुंबात वाढलेली मोठी मुलगी वय वर्ष 6 . प्रचंड मस्तीखोर आणी द्वाड अभ्यासात कच्ची आणी तिच्या भविष्याच्या चिंतेमुळे लहानपणी तिचे वडिल गावच्या गुरुजीना तिची कुंडली दाखवतात. गुरुजी तीची कुंडली पाहुन तिच्या कुंडलीत मंगळ दोष असल्याचे सांगतात आणी तीच जुन्या पिंपळ झाडाशी लग्न लावुन देण्याचे सुचवतात.
आई वडिल पारंपारीक पद्धतीने थाटामाटात तिच लग्न झाडा सोबत लावुन देतात. वर्ष जातात गोष्टी बदलतात आपली समृद्धी काॅलेज मध्ये जाऊ लागते आणी दरम्यान एका मुलाच्या प्रेमाची चाहुल तिला लागते पण गोष्टी घडण्या आधीच त्या मुलाच एक्सिडंट होत आणी ते दुरावतात. काळाने समृद्धीला गोष्टींचा विसर पडतो ती आयुष्यात मुव ऑन होते . तिचे आईवडिल सुयोग्य वर पाहुन तिच लग्न ठरवत असतात पण प्रत्येक वेळेस काही अडचणी येतच असतात. काही महिन्यांनी धैर्य तिच्या आयुष्यात येतो वयाने मोठा असला तरी दिसायला देखणा आणी घरच्यांनी सुचवलेल्या ह्या स्थळाला मान्यता मिळते आणी सगळ्यांना आश्चर्य वाटतं की ह्या वेळेला काहीच कसं वाईट नाही घडलं सगळ कस सुरळीत चालु आहे पण लग्न होतं. .. आणी लग्नाच्या पहिल्याच रात्री पहिल्यांदा "तो" तिच्या समोर येतो आणी लग्न कधीही यशस्वी न होऊ देण्याचं आणी तिच्या काॅलेज मित्र आणी आयुष्यात येणार्या प्रत्येक मुलांसोबत हेच घडवण्याचे चॅलेंज देतो ती पुरती हादरते आणी काही कळायच्या आतच धैर्य तिचा नवरा आत येतो आणी
तो येताच हा तिच्या डोळ्या देखत अदृश्य होतो. हा तोच ज्याच्या सोबत पिंपळ झाडासोबत लग्न लागलं तेव्हापासुन त्यांची गाठ जुळल्याच तो सांगतो. ती हादरलेली काहीच बोलत नाही. धैर्य मध्ये अशा काय शक्ती आहेत की ज्याच्या पुढे त्याचा टिकाव लागत नाहीये. धैर्य च्या आयुष्यात येण्याने तिच्या आयुष्यातील घटनाक्रमांत बदल होतील का ?
धैर्य सामान्य व्यक्तीमत्वाचा असामान्य व्यक्ती. उपजिविकेसाठी स्वतःच्या ऑफिस मध्ये काम करणारा पण असामान्य अशा शक्तींचा मालक. परिवार मध्ये एक बहिन स्वरा, एक भाऊ लकी वडील राम आई प्रभा असा पुर्ण परीवार त्याला अतिशय जीव लावणारा. घरात सर्वात मोठा असल्याने त्याला जबाबदारीची जाणीव असुनही आपल्या कामात हरवलेला आणी व्यस्त फॅमिली ला वेळ देऊ शकत नव्हता कधीच. राम आणी प्रभा चा विशेष जीव धैर्य वर होता त्याला कारण ही तसच होतं . राम आणी प्रभा च्या लग्नाला 5 वर्ष होऊन देखील त्याना मुल होत नसताना धैर्य च्या येण्याने त्यांच्या आयुष्यातली कमी भरुन येते.
समृद्धी च्या आयुष्यात तिचे आई वडिल या व्यतिरीक्त एक लहान बहिण आणी एक लहान भाऊ तिच्या लहानपणी तिच्या पिंपळाच्या लग्नानंतरच निघुन गेले. तिचे आजोबा घर सोडुन निघुन गेले. त्यामुळे आजीची जबाबदारी आणी घरची जबाबदारी वडिलांनी पेलली.
आजोबा कुठे निघुन गेले कुणालाच माहीत नाही.
पण दिनकर राव आपल्याला दिसतात ते कोल्हापुरच्या एक्सिडंट
स्पाॅटवर एका दांपत्याचा अपघात झालेला असतो. त्यात एक लहान मुलगा वय वर्ष 12 सर्व्हाईव करतो तो पण आजोबा त्याला पकडतात म्हणुन.. आजोबा त्या मुलाला वाचवुन आपल्या सोबत घेऊन निघतात. त्यांना मानणार्या कुटुंबा पैकी राम आणी प्रभा असतात. गुरुजी त्यांच्या घरी आश्रयाला राहतात आणी दिनकर गुरुजी स्वतः सोबत त्या मुलाला तिथे घेऊन येतात. त्या मुलाचे आईवडील वारल्याने तो अनाथ असल्याचे त्या कुटुंबाला सांगतात. प्रभाला आपल्याला मुल नसल्याची खंत गुरुजींना सांगितलेली असते . ते ह्या मुलाच्या संगोपणाची जबाबदारी हक्काने त्यांच्यावर सोपवतात. आणी आनंदाने त्या मुलाचा स्विकार करतात. तो मुलगा म्हणजेच आपला धैर्य. गुरुजी त्यांना लवकरच स्वतःची अपत्य होतील पण धैर्यला अंतर न देण्याचे बजावतात. गुरुजी वेळ देऊन धैर्य ला स्वतःचा शिष्य म्हणुन स्विकारतात आणी पारंगत करतात आणी राम प्रभाचा निरोप घेऊन एक दिवस तिथुन निघतात आणी जाताना धैर्य कडुन राम प्रभाच्या परिवाराच्या फॅमिलीच्या परिवराचा स्वतःच्या फॅमिली मानुन कायम तिथेच राहण्याचा आणी चांगल्या वाईट काळात साथ देण्याचे बजावतात. तसेच गुरूदक्षिणा म्हणुन योग्यवेळी सांगतिल्यावर पुर्ण करण्याचे वचन घेतात.
वर्ष जातात धैर्य ला राम आणी प्रभाने आपलसं केलेलं आणी प्रचंड जिव लावलेला असतो पण धैर्यला दिनकर गुरुजी त्यांची शिकवण आणी आपल्या घराची ओढ पण असते. त्यात त्याची प्रचंड घुसमट होत असते. गुरुजींनी आपल्याला का घराबद्दल सांगितल नाही तिथे का सोडल नाही. ह्याची खंत त्याला कायम असते पण प्राण रक्षक गुरुजींना दिलेल्या वचनासाठी धैर्य परत कधीच नाव घेत नाही. धैर्यचे खरे आईवडील म्हणजेच प्रभाकर आणी सुधा गावचं प्रतिष्ठित कुटुंब पैसा अडका जमीन जुमला प्रतिष्ठा मान सन्मान कसलीही कमी नसते. लक्ष्मी पायाशी लोटांगण घालत असते पण पारिवारिक वादाने त्यांचा बळी घेतलेला असतो. त्यांच्या प्रॉपर्टी साठी त्यांच्याच भावाने त्यांचा काटा काढलेला असतो. धैर्य वयाने लहान असल्याने त्याला ह्याची काही माहिती नसते आणि कालान्वये त्याला गुरुजी वचनामुळे जायची इच्छा पण नसते. १० वर्षाचा धैर्य आता २३ वर्षाचा असतो पूर्णपणे गुरुजींनी शिकवलेल्या विद्येला समर्पित आयुष्य जगत. धैर्य राम आणि प्रभा च्या संसारात पूर्णपणे रुळतो पण स्वरा आणी लकी धैर्यला परकेपणाची जाणीव करून देत त्याला कारण मालती आत्या रामची बहिण ज्यांनी रामना स्वतःचे अपत्य होताच धैर्यला परक केलं होत. पण राम आपल्या गुरुला दिलेल्या वचनासाठी सगळं काही दुर्लक्ष करत जगत होता आणि तो दिवस येतो जेव्हा काही वर्षांनी पुन्हा एका त्याला त्याचे गुरुजी म्हणजेच दिनकर गुरुजी भेटतात
धैर्य च्या आयुष्यात परत आलेले भार्गव गुरुजी काय सांगणार आपल्या घराविषयी सांगतात कि आणि काही ह्याचा विचार करत असतानाच भार्गव गुरुजी त्याला दिलेल्या त्यांच्या शिक्षणाची आणि विद्येची गुरुदक्षिणा द्यायची वेळ
झाली असं सांगतात. आता पर्यंत गुरुजींनी कशाचीही मागणी नाही केली आज अचानक काय मागतील असा विचार धैर्य करत असतो आणि गुरुजी आपल्या नातीची म्हणजेच समृद्धीची जीवाची रक्षा करण्याचे तिच्याशी लग्न गाठ बांधण्याचे आणि तिला अभय देण्याचे वचन घेतात. इतक्या वर्षांनी परत येऊन आपल्या फॅमिली बद्दल काही माहिती सांगतील ह्याची अपेक्षा असते पण अचानक आलेल्या लग्नाच्या प्रस्तावाने आणि वचनाने धैर्य गोंधळून जातो त्याला गुरुजींना गुरुदक्षिणा द्यायची असते पण त्यासाठी अनोळखी मुलीसोबत लग्न करावं लागेल ह्याला त्याची मानसीक तयारी नसते.
Comments
Post a Comment