आत्मविश्वास

सुधा देशपांडे चाळीशी ओलांडलेली आणि मराठी घरातली एक सामान्य गृहिणी . जिने पूर्णपणे संसाराला वाहून घेतलं आणि स्वतःच अस्तित्व कधीच कुठेच हरवून बसली तिलाच कळालं नाही.
तशी सुधा खूप धीराची आणि तशीच धडाडीची घरच्या प्रत्येक कामात तिची स्वतःची एक लकब आणि वर्चस्व
सासू सासऱ्यांची सेवा असो किंवा दोन्ही मुलांची जबाबदारी तिने लीलया पेलली आणि निभावली .वयाच्या ७५ गाठलेल्या आणि रिटायर पोलीस असलेल्या सासरेबुआंचे अलग कारनामे सतत कटकट करणे आणी सगळ्याला स्वतःचे नियम लादून त्याचा ततोतांत पाठपुरावा करेपर्यंत श्रीधर रावांना चैनच नसे .पोलीस कर्तव्यातून जरी ते रिटायर झाले असलें तरी घरात मात्र अजूनही त्यांची ड्युटी सुरूच होती . हे काय कमी म्हणून सुधाची सासू सुलभा देशपांडे ७० गाठलेली कजाग बाई . जिला आपला आणि आपल्या मुलांपुढे दुसरा जग दिसत नाही कधी सुनेशी नीट बोलली नाही कि कधी तिच्या दुखण्या खुपन्यात तिची साथ दिली नाही . येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सुद्धा सुधा एकट्याने हसत सामोरी जात होती. सासू च्या सवयी मध्ये खास सवय म्हणजे मुखात देवाचं नाव जपणं आणि कारवाया मात्र इकडचं तिकडे करणे संपूर्ण घरात आणि कॉलोनीत हिच्या कारवाईची चर्चा सासूचा सासुरवास ह्याच मूर्तीमंत रूप नवरा सतीश देशमुख तसा वेल एजुकेटेड आणि मोठ्या पगाराचा नोकरदार ९ ते ५ जॉब सतत २५ वर्ष जबाबदारीने आणि कटाक्षाने करणारा त्याला कधी कळलंच नाही कि त्याच्या वेळा ती राखत होती . तो यशाच्या पायऱ्या चढत होता पण मागची प्रेरणा आणि बळ सुधाचं होती. त्याला कधी तिने तशी जाणीवच होऊ दिली नव्हती. त्याच्या यशात नक्कीच मोठा सिंहाचा वाटा सुधाचा होता पण हे मान्य करेल तर तो सतीश कसला तो आपल्याच यशाचं कोडकौतुक करत आपलच यश दिमाखात मिरवत आयुष्य जगत होता . मोठ्या अंहकारी वृत्तीचा तिचा नवरा तिच्या बाबतीत थोडा छे जरा अधिकच कडक शिस्तीचा होता त्याच्या शिस्तीचा धाक दोन्ही मुलांच्या उपब्रिगिंग मधे जाणवत होतं पावलोपावली वडलांची असलेली जरब आणि सगळ्या निर्णयात त्यांच असलेलं मत ह्याला रेणू आणि चिनू कंटाळले होते आपल्याच बाबतीत वडिलांचे अनेक रूल्स आहेत आणि वडिलांनी आपल्याला आईसारखा कायम धाकात ठेवलाय आपला आयुष्य फुकट जातंय असा राग दोघांच्या मनात प्रचंड होता आणि त्यात भर होती ती दामिनी आत्येच्या अवाजवी ढवळाढवळ आणि स्वतःच आयुष्य मनमानी जगणाऱ्या वडिलांच्या बहिणीची. लहान पासूनच चिनू आणि रेणू आत्ये आपल्या घरात का राहते ह्या प्रश्नच उत्तर शोधात असत आता त्यांचं सुजाण वय असल्याने हळू हळू त्यांच्या लक्षात आलं कि आत्ये आपल्या नवऱ्याशी भांडून त्याच घर सोडून कायमची घरी आली ती आलीच परत कधीच तिने मागे वळून पहिलाश नाही . सुद्धा आणि दामिनी तशा एकाच वयाच्या फरक फक्त इतकाच एक आहे सासुरवाशीण आणि दुसरी माहेरवाशीण त्यामुळे कायमच दामिनीचा आवाज घरात वरचा . सासू सासरे तर होतेच त्यात आणखी हि एक भर आपल्या आईला असा जगताना बघून त्यांनी गृहीत धरलाच होता कि हि अशीच आहे.आणि हिला हीच वागणूक द्यायची असते. त्यानी देखील सुधाला गृहीत धरणा लहानपणीच सुरवात केली होती.दोघांनी पण कॉलेज सुरु झाल्यापासून आपला एक अलग विश्व निर्माण केला होता घरात दबकून राहणारे चिनू आणि रेणू बाहेर तितकेच बहकलेलं आयुष्य जगत होते . २१ व्या शतकातील इतर मुलं मुलींप्रमाणे त्यांचे पण अलग स्वप्न आणि शाॅर्टकट्स लाईफ जगण्याचे सगळे प्रयत्न चालू होते. आपल्या संस्कारानी सगळ्यांचं मन जिंकणारी सुद्धा मुलांच्या बाबतीत कुठे कमी पडली देवाचं जाणे. तर अशा आपल्या सुधा हरवुन गेलेली असताना एकदिवशी सुधाला बाजारात तिची पुर्विची मैत्रिण रेखा भेटते सुरुवातीला रेखा सुधाला ओळखतच नाही कारण कमालीची आतमविश्वासाने भरलेली जोशीली सुधा आता पूर्णपणे थकलेली आणि चाळीशीत पन्नाशीचा पांघरुन घातलेली सुधा आता इकदम अलग वाटत होती तरीही रेखा गाडी थाम्बवून रस्त्यात हरवलेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या आपल्या जिवाभावाच्या मैत्रिणीला ओळखलेच आणि तिच्या घरी जाण्याचा हट्ट करते . ना राहवून आणि आपली अवस्था लक्षात येऊ नये म्हणून हजार टाळाटाळ करणायचा प्रयत्न करून अखेर सुधा तिला घरी नेते आणि घरातला शुद्धच अस्तित्व पाहून रेखा थक्क होते. एखाद्या पायपुसण्याची जागा असलेली सुधा हि आपली सुद्धा नव्हेच जी शाळे मध्ये दुसऱ्या मुलींच्या अन्यायात आवाज उठवणारी धावून जाणारी सुधा आता स्वतः त्याहून गयागुजरा आयुष्य जगतेय पाहून रेखाला न राहवून रेखा तिथून निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घरी सुधाला भेटायला बोलावते . सुधा पण नाही नाही म्हणत पोहोचतेच आणि तीच वैभव आणि यश पाहून खूप सुखावते तेव्हा रेखा तिला जाणीव करून देते मी आता जशी तू आहेस तुझ्यासारखी होते तू मला आत्मविश्वास दिलास आणि आता तू असा आयुष्य जगतेयस का कशासाठी एकदा आत्मापरीक्षण कर काय होतीस तू काय झालीस तू तुझं अस्तित्व कुठेय माझी सुधा कुठेय आणि बराच काही सुनावल्यानंतर वाचन घेते मला माझी सुद्धा परत हवीय आत्मविश्वासाने भरलेली स्वतःच्या नियमांनी जगनारी आणि खळखळून हसणारी शाळेमध्ये सगळ्यांची लाडकी असणारी आणि सगळ्या शाखेत पुढे असणारी ह्या शब्दांनी सुद्धा कुठेतरी स्वतःच अस्तित्व शोधू लागते आणि तिला आपला आयुष्य परत नव्याने आपण जगावं ह्याची जाणीव होते आपल्या घराची विस्कटलेली घडी तिच्या लक्षात आलेली असते पण तिचा हतबल पणा आपल्याच घरच्याचं कसा नुकसान करताय ह्याची जाणीव होऊन ना राहवुन आपला संसाराचा गाडा योग्य दिशेने वळवून आपला अस्तित्व निर्माण करण्याचा निर्णय सुधा घेते.ती आपल्या जिवाभावाच्या मैत्रिणीला दिलेल्या वचनांचा पालन करण्याचा निर्णय घेते. आणि सुरु होते तिच्या संघर्षाची कहाणी
स्वतःचा आत्मविश्वास पुन्हा मिळवू शकेल का सुधा ?
सुधा आपल्या घरच्यांच्या आयुष्यात आपला स्थानं कसं बनवणार ?
स्वतःच्या कुमार्गाला लागलेल्या मुलांना परत योग्य मार्गावर कसा आणणारं ?
तीच समाजासाठी काम करण्याचं समाज कार्य करण्याचं स्वप्नं ती पुन्हा नव्याने सुरु करेल का ??
Comments
Post a Comment