Dhairya Mangal

Dhairyamangal
समृद्धी साठे ब्राह्मण कुटुंबात वाढलेली मोठी मुलगी वय वर्ष 6 . प्रचंड मस्तीखोर आणी द्वाड अभ्यासात कच्ची आणी तिच्या भविष्याच्या चिंतेमुळे लहानपणी तिचे वडिल गावच्या गुरुजीना तिची कुंडली दाखवतात. गुरुजी तीची कुंडली पाहुन तिच्या कुंडलीत मंगळ दोष असल्याचे सांगतात आणी तीच जुन्या पिंपळ झाडाशी लग्न लावुन देण्याचे सुचवतात.
आई वडिल पारंपारीक पद्धतीने थाटामाटात तिच लग्न झाडा सोबत लावुन देतात. वर्ष जातात गोष्टी बदलतात आपली समृद्धी काॅलेज मध्ये जाऊ लागते आणी दरम्यान एका मुलाच्या प्रेमाची चाहुल तिला लागते पण गोष्टी घडण्या आधीच त्या मुलाच एक्सिडंट होत आणी ते दुरावतात. काळाने समृद्धीला गोष्टींचा विसर पडतो ती आयुष्यात मुव ऑन होते . तिचे आईवडिल सुयोग्य वर पाहुन तिच लग्न ठरवत असतात पण प्रत्येक वेळेस काही अडचणी येतच असतात. काही महिन्यांनी धैर्य तिच्या आयुष्यात येतो वयाने मोठा असला तरी दिसायला देखणा आणी घरच्यांनी सुचवलेल्या ह्या स्थळाला मान्यता मिळते आणी सगळ्यांना आश्चर्य वाटतं की ह्या वेळेला काहीच कसं वाईट नाही घडलं सगळ कस सुरळीत चालु आहे पण लग्न होतं. .. आणी लग्नाच्या पहिल्याच रात्री पहिल्यांदा “तो” तिच्या समोर येतो आणी लग्न कधीही यशस्वी न होऊ देण्याचं आणी तिच्या काॅलेज मित्र आणी आयुष्यात येणार्या प्रत्येक मुलांसोबत हेच घडवण्याचे चॅलेंज देतो ती पुरती हादरते आणी काही कळायच्या आतच धैर्य तिचा नवरा आत येतो आणी
तो येताच हा तिच्या डोळ्या देखत अदृश्य होतो. हा तोच ज्याच्या सोबत पिंपळ झाडासोबत लग्न लागलं तेव्हापासुन त्यांची गाठ जुळल्याच तो सांगतो. ती हादरलेली काहीच बोलत नाही. धैर्य मध्ये अशा काय शक्ती आहेत की ज्याच्या पुढे त्याचा टिकाव लागत नाहीये. धैर्य च्या आयुष्यात येण्याने तिच्या आयुष्यातील घटनाक्रमांत बदल होतील का ?
धैर्य सामान्य व्यक्तीमत्वाचा असामान्य व्यक्ती. उपजिविकेसाठी स्वतःच्या ऑफिस मध्ये काम करणारा पण असामान्य अशा शक्तींचा मालक. परिवार मध्ये एक बहिन स्वरा, एक भाऊ लकी वडील राम आई प्रभा असा पुर्ण परीवार त्याला अतिशय जीव लावणारा. घरात सर्वात मोठा असल्याने त्याला जबाबदारीची जाणीव असुनही आपल्या कामात हरवलेला आणी व्यस्त फॅमिली ला वेळ देऊ शकत नव्हता कधीच. राम आणी प्रभा चा विशेष जीव धैर्य वर होता त्याला कारण ही तसच होतं . राम आणी प्रभा च्या लग्नाला 5 वर्ष होऊन देखील त्याना मुल होत नसताना धैर्य च्या येण्याने त्यांच्या आयुष्यातली कमी भरुन येते.
समृद्धी च्या आयुष्यात तिचे आई वडिल या व्यतिरीक्त एक लहान बहिण आणी एक लहान भाऊ तिच्या लहानपणी तिच्या पिंपळाच्या लग्नानंतरच निघुन गेले. तिचे आजोबा घर सोडुन निघुन गेले. त्यामुळे आजीची जबाबदारी आणी घरची जबाबदारी वडिलांनी पेलली.
आजोबा कुठे निघुन गेले कुणालाच माहीत नाही.
पण भार्गव गुरुजी आपल्याला दिसतात ते कोल्हापुरच्या एक्सिडंट
स्पाॅटवर एका दांपत्याचा अपघात झालेला असतो. त्यात एक लहान मुलगा वय वर्ष 12 सर्व्हाईव करतो तो पण आजोबा त्याला पकडतात म्हणुन.. आजोबा त्या मुलाला वाचवुन आपल्या सोबत घेऊन निघतात. त्यांना मानणार्या कुटुंबा पैकी
राम आणी प्रभा असतात. गुरुजी त्यांच्या घरी आश्रयाला राहतात आणी दिनकर गुरुजी स्वतः सोबत त्या मुलाला तिथे घेऊन येतात. त्या मुलाचे आईवडील वारल्याने तो अनाथ असल्याचे त्या कुटुंबाला सांगतात. प्रभाला आपल्याला मुल नसल्याची खंत गुरुजींना सांगितलेली असते . ते ह्या मुलाच्या संगोपणाची जबाबदारी हक्काने त्यांच्यावर सोपवतात. आणी आनंदाने त्या मुलाचा स्विकार करतात. तो मुलगा म्हणजेच आपला धैर्य. गुरुजी त्यांना लवकरच स्वतःची अपत्य होतील पण धैर्यला अंतर न देण्याचे बजावतात. गुरुजी वेळ देऊन धैर्य ला स्वतःचा शिष्य म्हणुन स्विकारतात आणी पारंगत करतात आणी राम प्रभाचा निरोप घेऊन एक दिवस तिथुन निघतात आणी जाताना धैर्य कडुन राम प्रभाच्या परिवाराच्या फॅमिलीच्या परिवराचा स्वतःच्या फॅमिली मानुन कायम तिथेच राहण्याचा आणी चांगल्या वाईट काळात साथ देण्याचे बजावतात. तसेच गुरूदक्षिणा म्हणुन योग्यवेळी सांगतिल्यावर पुर्ण करण्याचे वचन घेतात.
वर्ष जातात धैर्य ला राम आणी प्रभाने आपलसं केलेलं आणी प्रचंड जिव लावलेला असतो पण धैर्यला भार्गव गुरुजी त्यांची शिकवण आणी आपल्या घराची ओढ पण असते. त्यात त्याची प्रचंड घुसमट होत असते. गुरुजींनी आपल्याला का घराबद्दल सांगितल नाही तिथे का सोडल नाही. ह्याची खंत त्याला कायम असते पण प्राण रक्षक गुरुजींना दिलेल्या वचनासाठी धैर्य परत कधीच नाव घेत नाही. धैर्यचे खरे आईवडील म्हणजेच प्रभाकर आणी सुधा गावचं प्रतिष्ठित कुटुंब पैसा अडका जमीन जुमला
प्रतिष्ठा मान सन्मान कसलीही कमी नसते. लक्ष्मी पायाशी लोटांगण घालत असते पण पारिवारिक वादाने त्यांचा बळी घेतलेला असतो. त्यांच्या प्रॉपर्टी साठी त्यांच्याच भावाने त्यांचा काटा काढलेला असतो. धैर्य वयाने लहान असल्याने त्याला ह्याची काही माहिती नसते आणि कालान्वये त्याला गुरुजी वचनामुळे जायची इच्छा पण नसते. १० वर्षाचा धैर्य आता २३ वर्षाचा असतो पूर्णपणे गुरुजींनी शिकवलेल्या विद्येला समर्पित आयुष्य जगत. धैर्य राम आणि प्रभा च्या संसारात पूर्णपणे रुळतो पण स्वरा आणी लकी धैर्यला परकेपणाची जाणीव करून देत त्याला कारण मालती आत्या रामची बहिण ज्यांनी रामना स्वतःचे अपत्य होताच धैर्यला परक केलं होत. पण राम आपल्या गुरुला दिलेल्या वचनासाठी सगळं काही दुर्लक्ष करत जगत होता आणि तो दिवस येतो जेव्हा काही वर्षांनी पुन्हा एका त्याला त्याचे गुरुजी म्हणजेच भार्गव गुरुजी भेटतात
धैर्य च्या आयुष्यात परत आलेले भार्गव गुरुजी काय सांगणार आपल्या घराविषयी सांगतात कि आणि काही ह्याचा विचार करत असतानाच भार्गव गुरुजी त्याला दिलेल्या त्यांच्या शिक्षणाची आणि विद्येची गुरुदक्षिणा द्यायची वेळ
झाली असं सांगतात. आता पर्यंत गुरुजींनी कशाचीही मागणी नाही केली आज अचानक काय मागतील असा विचार धैर्य करत असतो आणि गुरुजी आपल्या नातीची म्हणजेच समृद्धीची जीवाची रक्षा करण्याचे तिच्याशी लग्न गाठ बांधण्याचे आणि तिला अभय देण्याचे वचन घेतात. इतक्या वर्षांनी परत येऊन आपल्या फॅमिली बद्दल काही माहिती सांगतील ह्याची अपेक्षा
असते पण अचानक आलेल्या लग्नाच्या प्रस्तावाने आणि वचनाने धैर्य गोंधळून जातो त्याला गुरुजींना गुरुदक्षिणा द्यायची असते पण त्यासाठी अनोळखी मुलीसोबत लग्न करावं लागेल ह्याला त्याची मानसीक तयारी नसते.
पण गुरुजी धैर्यला तिच्या आयुष्यात घडलेली घटना आणी पाठी लागलेल्या त्या सावली बद्दल सांगतात. त्या सावली पासुन तिची रक्षा तोच करू शकतो कारण भार्गव गुरुजींनी शिकवलेली विद्या आणी धैर्यच्या आत्मसात शक्ती आणी त्याच्या कुंडलीतल्या ग्रह तार्यांची संरचना . गुरुजी त्याला वेळ आल्यावर गोष्टींचा उलगडा करण्याच देखील सांगतात.आणी धैर्य तिचा अभ्यास सुरू करतो. तिच्या जाण्याच्या वेळा, तिचा भुतकाळ वर्तमान सगळं जाणुन घेऊन त्या सावलीचा अभ्यास देखील ते करतो.
त्याला तिचा काहीच दॊष नसल्याचं आणी तिच्या मागें लागलेल्या सावलीचा उद्देश्य आणी प्रकाराची माहीती मिळते
धैर्य तिच्या आयुष्यात येऊन तिला ह्यातुन बाहेर काढण्यासाठी गुरुजीला वचन देतो.
त्यानुसार धैर्य तिच्या आयुष्यात एन्ट्री घेण्याचं ठरवतो आणि तशी संधी येते कारण कुणीच तिच्याशी लग्न करण्याची हिम्मत ठेवत नसतो कारण जो कुणी तसा प्रयत्न केलाच तर सावली त्याच्या मागे लागत असे. पण धैर्यला आपल्या गुरूच्या शिक्षेवर आणि आपल्या अर्जित ज्ञानावर विश्वास असतो तो त्या अदृश्य शक्तीशी दोन हात करण्यास तयार होतो आणि स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता लग्नाचं स्थळ बनून तिच्या घरच्यांना सामोरा जातो.
समृद्धी एव्हाना तिच्या आयुष्यात येणाऱ्या संकटाना पाहून खचलेली असते म्हणून आढे वेढे न घेता ती लग्नाला होकार देते. पण तिच्या घरच्यांना ह्यावेळी काय संकट येईल आणि काय परिणाम होतील ह्या भीतीने ग्रासलेलं असते ते धैर्य ला फार काही सांगत नाहीत फक्त जपून राहण्याचा सल्ला देतात पण धैर्य आपल्या मिश्किल स्वभावाने सगळ्यांचं मन सुद्धा जिंकतो आणि सर्वाना आशवस्थं सुद्धा करतो. आणि घरात पाऊल ठेवताच पहिल्यांदा “ तो “ धैर्य समोर येतो. पण धैर्य आपल्या ज्ञात मंत्र शक्ती आणि सुरक्षा कवच रुपी रुद्राक्षाची संपुटाने त्याला बंधन घालतो ज्या मुळे कुणाला काही कळण्या आधी ती शक्ती तिथून नाहीशी होते आणि धैर्यला आव्हान देऊन निघून जाते.
इथे समृद्धी आपल्या आयुष्यात येणाऱ्या धैर्य बद्दल कुतुहूलाने पाहत असते. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असते . आतापर्यंत घडलेल्या घटनांनी भेदरलेली समृद्धी पुन्हा निर्भीड आणि निर्धास्त होते तिला आपल्या आयुष्यात सुखाची चाहूल लागते. ज्या आनंदी स्वभावाची आणि खेळकर खोडकर स्वभावाची ती असते कॉलेज मध्ये ज्या पद्धतीने ती आतमविश्वासाने भरलेली असते. तिच्या बॉयफ्रेंड च्या मृत्यू नंतर खचलेली ती पुन्हा खुलून उठते पण धैर्य हळू हळू सगळ्यांचं मन जिंकून त्या शक्तीच्या मूळ स्रोता पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो पण नेहमी काही ना काही घडून त्याला त्या शक्तीच्या मुळा पर्यंत पोहोचण्यास अडथळा येत असतो. समृद्धी ला अदृश्य शक्तीची अजूनही जाणीव नसते ओळख नसते फक्त
आपल्या कुंडलीतील मंगल दोषामुळे आपल्या सोबत ह्या घटना घडतात ह्याची तिला तिच्या कुटुंबीयांनी पूर्ती भीती घातलेली असते. आणि ह्याच सगळ्या अविश्वास आणि स्वतःच्या पायावर कुर्हाड मारण्याला कंटाळून भार्गव गुरुजींनी घर सोडलेलं असतं.. ज्या भार्गव गुरुजींची पंचक्रोशीत उदो उदो असतो त्यांना त्यांच्याच मुलाच्या आणि सुनेच्या बुद्धीपुढे हात टेकून घर सोडावं लागत. कारण नातीच्या सुखाला लागलेलं ग्रहण उघड्या डोळ्यांनी ते पाहू शकत नसतात आणि जे घडणार आहे त्याच तोड त्यांनाच शोधावं लागणार आणि योग्य वेळी परत येण्याचं मनाशी पक्क करून त्यांनी घर सोडलं होत त्यांनी त्याच हेतूने त्या अदृश्य शक्ती विरुद्ध आपला हत्यार म्हणून धैर्य ला पारंगत केलं होतं त्याच्यात असलेली लक्षण आणि सुप्त गुण हेरून त्यांनी धैर्यची निवड केली होती त्यांना पूर्ण विश्वास होता घरच्यांच्या मूर्ख पणामुळे ज्या अदृश्य शक्तीला त्यांनी घरी आणलाय त्या शक्ती विरूद्ध धैर्य च त्यांची तलवार होईल म्हणून त्या शक्तीला बंधन घालून आणि समृद्धी ला हळूच रक्षा कवच देऊन त्यांनी घराचा त्याग करून निघून जातात. आणि त्या शक्तीशी लढा देण्याला मर्यादा असल्याने ते फक्त त्यांना शक्य होतं तितक करून ते निघतात धैर्य ला आजोबांकडून मिळालेल्या माहिती नुसार लग्न झाल्या नंतरच त्याची खरी परीक्षा सुरु होणार ह्याची पूर्ण जाणीव असते आणि त्यासाठी तो पुर्णपणे तयार असतो आपल्या आयुष्यात एका नवीन नात्याला जागा करून द्यायला त्याला वेळ लागत असला तरी त्याच्या मनाचा ध्यास त्या अदृश्य शक्ती पासून समृद्धीची सुटका
करण्यात आणि त्या शक्तीला तीच अहित करण्यापासून रोखण्यात जास्त लक्ष असतो त्यामुळे बऱ्याचदा धैर्य तिला रुक्ष जाणवतो धैर्य त्या शक्तीच्या मुळाशी जाण्याकरता एक दिवस समृद्धीला त्या झाडापाशी घेऊन जायचं ठरवतो अर्थात तिला त्या शक्ती बद्दल काही माहित नसल्याने आणि ह्या घटनांचं मूळ त्या झाडाशी झालेल्या लग्नामुळे असल्याचं माहित नसल्याने ती सुद्धा गाठीभेटी निम्मिताने विरंगुळा म्हणून त्या झाडापाशी नेते. ध्रुव आपल्या अभ्यासाने तिथली खरी परिस्थिती आणि त्या अदृश्य शक्तीच मूळ शोधण्यास सुरुवात करतो. समृद्धी ला कशाचीच माहिती नसल्याने तो असा हरवलेला का वाटतोय ह्याचाच राग जास्त येतो पण आई वडिलांच्या इच्छेखातर ती काहीही ना बोलता लग्नाच्या तयारी मध्ये रमते. धैर्य सचोटीने त्या स्थानाला पुन्हा पुन्हा भेट देऊन त्या अदृश्य शक्तीच्या खऱ्या मूळ शोधण्याची सुरुवात करतो . एव्हाना ती अदृश्य शक्ती आपण धैर्यच काहीच वाईट करू शकत नसल्याचं आणि त्याच्यापुढे हतबल असल्याचं जाणवल्याने प्रचंड चीडलेली असते . पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही धैर्य वर काहीच असर
न झाल्याने त्या शक्तीला धैर्यच्या ह्या रहस्याचा आश्चर्य वाटत असत आपण इतके प्रयत्न करूनही आपली शक्ती ह्याच्यापुढे का चालत नाही आणि हा आपल्यावर वरचढ का ठरत आहे ह्याची पण त्या अदृश्य शक्तीला प्रश्न पडतो. म्हणजेच धैर्य त्या अदृश्य शक्तीच्या भेद शोधण्याच्या नादात आणि ती शक्ती धैर्य वर का आपली शक्ती काम करत नाही ह्या संभ्रमात असते. धैर्य ला आपल्या खऱ्या आई वडिलांच्या बाबत कधी माहिती मिळेल
ला ह्याची पण खंत आहेच कारण फक्त भार्गव गुरुजी त्याची खरी ओळख त्यांच्या सांगू शकत असतात आणि त्यांना गुरुदक्षिणा देऊनच आपल्याला आपला भूतकाळ जाणून घेता येईल ह्याची पण त्याला जाणीव असते तर अशा रितीने अगदी राम आणि प्रभा आपल्याच मुलाचं लग्न असल्या प्रमाणे कौतुकाने सगळ्या लग्नापुर्वीच्या रितीरिवाजात सहभागी होतात आणि एकदिवस त्यांचं लग्न थाटामाटात पार पडत. आतापर्यंत त्या अदृश्य शक्तीपासून अनभिज्ञ असलेली समृद्धी आता मंगल दोषापासून आपण सुटलो आणि आता आपण नव्याने सुखी आयुष्य जगण्याची स्वप्न रंगवत असते तेव्हाच ती अदृश्य शक्ती पहिल्यांदा समृद्धीच्या समोर येते आणि तिला तीच लग्न पहिला त्या झाडाशी म्हणजेच त्या अदृश्य शक्तीशी झालंय आणि आतापर्यंत तिच्या आयुष्यात झालेल्या सर्व वाईट घटना ह्या त्याच्याच घडवलेल्या असल्याची कबुली देतो आणि ह्या पुढे सुद्धा तो तिची पाठ सोडणार नसल्याचं आणि तिला नामोहरम करण्याचं तिला आव्हान देतो ती सर्व प्रकाराने पूर्ती हादरलेली असतानाच धैर्य रूम मध्ये येतो आणि ती अदृश्य शक्ती गायब होते . ती काही बोलणार इतक्यात धैर्य काही घडलंच नाही अस भासवतो. त्याला पाहून समृद्धीला बरं वाटत आपल्या वाट्याला इतक्या वर्षांनी आलेल सुख आणि आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीच्या काळजीपोटी ती खूप हादरलेली असते आणि फक्त त्याला आपल्यामुळे तो किती मोठ्या संकटात पडल्याची भीती बोलून दाखवते कारण तिच्यासाठी धैर्य हा सामान्य वास्तुशास्त्रज्ञ असतो.
तोच तिची खरी ढाल आहे आणि तोच खरा रक्षक ह्याची तिला जाणीव पण नसते. पण धैर्य तिला स्वप्न पडल अस काहीच ना घडल्याचं सांगतो आणि तिला आपल्या शब्दांनी आश्वस्थ करतो. तिला आपल्या डोळ्यांवर विश्वास असतो पण सामान्य व्यक्ती समजून धैर्य घाबरू नये म्हणून ती सुद्धा विषय बदलते आणि काही घडलंच नाही हे तिला पटलंय असा त्याला भासवते. धैर्य रुक्ष पने ह्या लग्नाकडे आणि एक वचन म्हणून पाहत असतो पण ह्याच घटनेत त्याचा भूतकाळ दडलंय ह्याची त्याला सुद्धा कल्पना नसते. पण इथे भार्गव गुरुजी ज्यांनी धैर्य ला दीक्षा दिल्यानंतर आपली तंत्र शक्तीचा सराव सोडलेला असतो आणि धैर्य कडून वचन घेऊन तीर्थयात्रेला निघून जाऊन भूमिगत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यांना परतण्याची वेळ झाली ह्याची जाणीव धैर्य कॉल करून देतो . मी वचन दिल्याप्रमाणे समृद्धीशी लग्न करून तीच त्या अदृश्य शक्ती पासून रक्षण करत असल्याचं तो कळवतो हे ऐकताच आता तुझ्या भूतकाळाची माहिती देन्याची वेळ आलीय आलीय मी येतोय असा भार्गव गुरुजी कळवतात
भार्गव गुरुजी परत आल्याने समृद्धी आणि तिच्या घरचे प्रचंड खुश होतात. आणि ते आणि धैर्य एकमेकांना पहिल्यांदाच भेटतायत असा भासवतात. योग्य वेळ शोधत भार्गव गुरुजी धैर्य ला त्याच झाडाजवळ घेऊन जातात आणि त्याच्या आयुष्यातल्या ना उलगडलेल्या रहस्या बद्दल पण सांगतात.
तर ह्या कहाणीचा दुसरा भाग जोडलेला असतो धैर्याच्या
भूतकाळाशी धैर्यचे खरे आईवडील म्हणजेच प्रभाकर आणि सुधा माई यांच्या आयुष्यातली . धैर्य ला पुसटशी कल्पना पण नसते आपल्या भूतकाळाबद्दल पण कोल्हापूरच्या प्रतिष्ठित घराण्यात जन्म झालेला धैर्य हा प्रभाकर आणि सुधा माईचा एकुलता एक मुलगा असतो अतिशय लाडावलेल्या आणि राजपुत्रासारखा संपूर्ण गाव प्रभाकर रावांना प्रचंड मान देत असतात त्याचे साखर कारखाने त्यांची शेती ज्या पण काम धंद्यात प्रभाकर राव हात घालत असत त्यात यश आणि कीर्ती मिळणारच हे जणू ठरलेलाच होत सुधा माई हि गावाची आईच होती सगळयात आपलंस केलेले कुठलाही कामगार नोकर चाकर सुधामाई पुढे खाली हात जात नसे पण तितकाच हरामी प्रभाकर रावांचा भाऊ दौलत राव जुगार , बाई , दारू ह्या सगळ्यात तल्लीन राहुन सतत आपल्या भावाच्या नशिबावर जळफळत असतो आपण काय करून त्याची संपत्तीचा मालक व्हावं आणि धैर्याला सुद्धा संपवावं ह्याचीच प्लांनिंग दौलत राव करत असे . ह्या सगळ्यात आपल्या भावाच्या चुकांवर पांघरून घालून त्याला कायम पाठीशी घालण्याची चूक मात्र प्रभाकर राव करतात त्यांच्या ह्याच चुकीची शिक्षा त्यांना मिळते आणि संधी साधून दौलत राव घात करतोच.
थोरला भाऊ असल्याने आणि वयाने ८ वर्षाने मोठा असल्याने दौलत रावच लग्न लौकर झालेलं असत मुलगा पण वयात आलेला आणि वडिलांच्या वळणावर गेलेला असतो लहान वयातच त्याला सुद्धा वडिलांसारखे छंद जुडतात आणि त्यातच एका शालीन कुटुंबातल्या मुलीच्या इज्जतीवर हात घालण्याच
पाप तो करतो आणि त्याची शिक्षा गावचे प्रतिष्ठित पंच म्हणून प्रभाकर रावांना द्यायची असते
प्रभाकर राव आपल्या घरातल्या व्यक्तीकडून झालेल्या पापाचं प्रायश्चित तर स्वतः घ्यायला तयार असल्याचं सांगतात आणि स्वतःहून शिक्षा करू असा पण सांगतात पण लोकांच्या रागापुढे त्यांचा नाईलाज होतो आणि ते दौलत रावच्या मुलाला विराटला गाढवावरून धिंड काढण्याचं आणि टक्कल करून चपलांचा हार घालून धिंड काढायची शिक्षा देतात. ह्याने दौलत प्रचंड दुखावला जातो आणि त्यात भर म्हणूनच दौलतचा मुलगा विराट अपमान सहन न होऊन गावाच्या पिंपळाच्या झाडाला दोर लटकवत आत्महत्या करतो आणि तोच राग दौलतच्या मनात खदखदत असतो आपल्या हातून आपल्या भावाला मनस्ताप झाला पुत्रशोक झाला ह्याच प्रायश्चित म्हणून प्रभाकर राव आपल्या भावाच्या सगळ्या आर्थिक गरज भागवत असतो. पण तोच अखेर घात करतो. दौलत अकॅसिडेंट घडवून आणतो आणि त्याच्या सांगोल्या संपत्तीचा मालक होतो . धैर्य ला आपल्या कहाणीची आणि आपल्या वडिलांच्या दुर्दैवी अंताची कहाणी ऐकून पाहिल्यान्दा खूप कोसळल्यासारखं होत आपण इतक्या आपल्या वडिलांना मुकलो त्यांचा सहवास न लाभल्याची खंत त्याला होते पण आतापर्यंत लपवलेली हि कहाणी आत्ताच गुरुजी का सांगत असावे आणि ह्या भूतकाळाशी वर्तमानाचा काय संबंध असा गुरुजीना तो विचारतो तेव्हा गुरुजी त्याला सांगतात हाच तो पिंपळ ज्याला लटकून तुझ्या चुलत भावाने आत्महत्या केलेली आणि ती अदृश्य शक्ती म्हणजे तुझाच चुलत
भाऊ विराट जो एक अतृप्त पिश्शाच बनलाय आणि नियतीने नाही तर त्याच काकाच्या सूडबुद्धीने त्याने आपल्या दुष्ट
गुरुजीला हरीला माझ्या मुलाच्या डोक्यात खुळ भरून हा प्रपंच घडवुन आणला मी गावात नसताना. लोक कल्याणा साठी एका व्यक्तीच्या आयुष्यातील संकट दुर करायला गेलो असताना संधी साधून घडवून आणला. आणि त्याच कारण म्हणजे प्रभाकर राव माझा खरा चाहता होता मला विचारल्याशिवाय कधीच कुठलाच निर्णय तो घेत नव्हता आणि म्हणूनच तो यशस्वी होत होता आणि दौलत राव ला कधीही ते जमलंच नाही. माझ्यावर असलेला राग त्याने वेळ आल्यावर आपल्या खोट्या आणि वाईट प्रवृत्तीच्या गुरूला हरीला पाठवून खोटा प्रपंच रचवून घडवून आणला. योगायोगाने मी ह्या सगळ्याच्या रागाने कंटाळून निघून जात असताना तुझ्या वडिलांची गाडी मला दिसली वाचवायला म्हणून मी पुढे आलोच होतो पण बिकट परिस्थिती होती आणि फक्त तुला वाचवू शकलो. आणि माझ्या सिद्धींचा आणि दीक्षेचा तुला उत्तराधिकारी बनवून मी तुला तयार केलं कारण वेळ आल्यावर तूच ह्या सर्व परिस्थितीचा सामना करावा आणि समृद्धी ला आणि स्वतःला ह्या स्थितीतून काढण्यासाठी तयार केलं. आता विराटची शक्ती प्रचंड असली तरी तू त्याची खरी काट आहेस. तूच समृद्धीची ढाल आहेस. ह्या सगळ्यातून मार्ग काढ आणि स्वतःची जागा पुन्हा मिळवं तुझ्या दौलत काकाला कसा हरवून स्वतःच गत वैभव परत मिळवायचं आणि त्याहून मोठी समस्या विराट ज्याने पिशाच्च बनून समृद्धीच्या मार्गात काटे मांडलेत त्याला तोंड द्यायचं.
धैर्य दिनकर गुरुजींना आश्वासन देतो तो ह्यातल्या कुठल्याही गोष्टी कुणालाही ना कळू देता आणि राम प्रभाला अंतर न देता आपला लढा सुरु ठेवणार.
धैर्यच्या समृद्धीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो आधी जो रुक्ष असतो त्याला आपल्या आणि आपल्या परिवारामुळे तिला इतका त्रास सहन करावा लागल्याची जाणीव होते. आणि तो तिला आपल्या आयुष्यात मानाचं स्थान देतो स्वीकारू लागतो. धैर्य ला आता आपला लढा अदृश्य शक्ती सोबत नाही तर विराट सोबत असल्याची माहिती असते आणि त्यासाठी त्या दृष्टीने तो तयारी सुरु करतो. काकांनी आणि त्यांच्या हरी गुरूने एकत्र येऊन विराट ला पिंपळ झाडा मध्ये स्थापित केलेलं असत त्याला जागा करून दिलेली असते ज्याची कुणालाच माहिती नसते. आणि कालांतराने विसर सुद्धा पडतो लोकांना ..आणि योग्य वेळी भावाचा घात आणि गुरुजींना आयुष्यभरासाठी शिक्षा करायच्या हेतूने भार्गव गुरुजींच्या मुलाला भ्रमित करून गोष्टी घडवून आणतात.
सगळ्यांना वाटत भार्गव गुरुजी मुलाने केलेल्या उपेक्षेमुळे घर सोडून गेले पण ते समृद्धीला ह्यातून सोडवायचा मार्ग शोधायला निघाले असताना असा अघटित दिसत आणि त्यांच्याकडे धैर्याला ह्या सगळ्यातुन लढण्यासाठी तयार करतात. वेळोवेळी त्याच मार्गदर्शन करून आणि त्याला आपल्याला ज्ञात सर्व सिद्धी देऊन विराट विरुद्ध तयार करतात. पण धैर्य हे सगळं ऐकल्यावर विराट ला ह्यातून कसा सोडवावा आणि समृद्धी ला
कसा वाचवावे ह्याचा विचार सुरु करतो.
Comments
Post a Comment