Sit com - Kool Ghar Kool
Genre — Sitcom
ही कहाणी आपली फिरत राहते मध्यम वर्गीय कुटुंबातल्या रघुवीर भोसले -माया भोसले आणि त्यांच्या फॅमिली भवती. खूप सामान्य अशा ह्या घरातील घडणाऱ्या रीयलिस्टिक घटनां मधून हास्य आणि तसच दैंनदिन घडामोडी तून माध्यमिक कुटुंबाची परिस्थिती सामोरं जाण्याची आणि मस्त हसत जुळवून घेण्याची शैली आपण दाखवतो.
कहानीतील मुख्य पात्र
रघुवीर भोसले, वय वर्ष ५०,
आयुष्यभर चाळीत राहून,इमानाने सरकारी नोकरी करणारे गृहस्थ, नाव रघुवीर पण काहानितला भित्रा ससा. फॅमिली ची जबाबदारी एकट्याने पेलणारी व्यक्ती
आपल्या घरासाठी झटणारा मोठा मुलगा
माया भोसले, वय वर्ष 46
माया भोसले नाव माया पण माया नाही ही तर महा माया , रघुवीर राव जितके सोपे तितकीच ही कठीण अगदी विरोधाभास , नवऱ्याला टोंबने मारणे हा आमचा धर्म. पण त्याच्या वाचून पान ही हलत नाही. पै पै जोडून स्वतःचा घरचा रगाडा हाकणारी रसाळ फनसासारखी माया.
शंतनु भोसले, वय वर्ष ४५,
कवी मनाचा हळवा माणूस. आयुष्यभर मोठ्या भावाने त्याला त्याच्या फॅमिलीला आणि त्याच्या मुलांना सांभाळणारा दादासाठी ऋणी असणारा भाऊ
स्वाती भोसले, वय वर्ष 38,
माया ची सावली स्वाती तिच्या कठोर स्वभावाला लोण्याची धार म्हणजे स्वाती . नवऱ्याला सांभाळून घेणारी , त्याच्या चुकांवर पांघरून घालणारी प्रेमळ धागा म्हणजे स्वाती.
Mandy म्हणजे माधुरी भोसले, वय वर्ष 20
नट्टापट्टा , नखरे, स्वतःला हिरोईन समजणारी, ताई, मीच माझ्या रुपाची राणी, रुपगर्वीता मॅंडी आम्हाला कूल राहायला आवडतं मॅंडी म्हणा माधुरी नाही.
Banjo, Bunty Bhosle, वय वर्ष 25
खट्याळ, आजीचा आणि आईचा जीव की प्राण बंटी पण बाहेर मित्र सगळे आम्हाला बंजो म्हणतात कारण पण तसच.
सतत बेंजो सारखं वाजत राहणं हा ह्याचा स्वभाव
आजोबा, चिन्मय राव भोसले , वय वर्ष 75
सतत पेंगत राहणे , खायला चमचमीत मागत राहणे आणि दुसऱ्यांच्या घरात नक खुपसने हा ह्याचा छंद रिटायरमेंट नंतर हाच एक विरंगुळा, बागेतले बगळे मित्र आणि चाळीतल्या लोकांच्या आयुष्यात डोकावत राहणे हाच ह्यांचा धंदा
आजी सुमित्रा ताई भोसले, वय वर्ष 67
मॅंडी मधले गुण सुमित्रा आजिकडूंनच आले असावेत त्यांच्या घराची खरी जान म्हणजे सुमित्रा आजी सतत देव देव करत राहणे. सगळ्या बाबतीत देवाला हाक मारल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही ,आणि देवाला blame करत राहणे हा आमचा जन्मजात हक्क. पण चिन्मय रावांना अतिशय अनुरूप अशा आपल्या सुमित्रा ताई ज्यांना गॉसिप केल्याशिवाय जेवण जात नाही.
चिंटू सौमित्र भोसले, वय वर्ष 8
नाव चिंटू पण अगडबंब शरीर , स्कूल मध्ये चाळीत चिंटूची फजिती चर्चेचा विषय.
Concept Note-
रघुवीर भोसले नावात वीर पण ह्यांच्या भित्रत पणाचे किस्से अख्ख्या चाळी मध्ये प्रसिद्ध.
म्हणून सगळी चाळीतली टारगट मूल त्यांच्या येण्या जाण्याच्या वेळेला काहीतरी कळ काढतातच. कधी फटाक्याची माळ, होळीत रंगाचं पाणी,
पण आपला रघुविर खरा धीराचा ,आई वडिलांना आपल्या फॅमिली ला भावाला कसलीही कमी पडू न देणारा त्याच कौतुक अगदी सगळ्यांनाच . 2 -2 रुपये जोडून घर चालवणारा माणूस आपला रघुवीर त्याची ही कला घरच्यांना मात्र वीट आणते.
दूध वाल्याला 2 रुपये द्यावे लागू नये म्हणून स्वतः जाऊन दूध आणणारा.
किराणा दर महिन्याला स्वतः घासाघीस करून चार दुकान सोडून जाऊन खरेदी करणारा. स्वतःसाठी एक वस्तू खरेदी करण्यापूर्वी 100 वेळा विचार करणारा. असा आपला रघुवीर ला बायको मात्र उधळी मिळाली .
माया मायाची कहनी ऐकाल तर झाशीची राणी च जणू. जीवन एकदाच मिळत जागून घेतलं पाहिजे नाही तर कधी करणार मी हा तिचा बाणा. रघुवीर राव एक एक पई जोडणारे तर माया ही महामाया स्वतःला आता नाही घेणार तर कधी हाऊस मौज करणार म्हणत पैसे खर्च करणारी. रघुवीर रावांना तिला कंट्रोल करणं म्हणजे तारेवरची कसरत. नाहीच ऐकला तर घर डोक्यावर घेतलंच म्हणून समजा पण ती आहे म्हणून घराला घरपण आहे. तिच्या ह्या स्वभावामुळे घरात रघुवीर रावांच्या कंजुसीची झळ कुणाला पोहोचत नाही.
Some suggested ideas for episodes..
EP 1: घरात एक नविन मुलगा येतो जो चिन्मय रावांना हेच माझे वडील आहेत सांगून घरात घुसतो, ह्यांचं माझ्या आई सोबत संबंध होते आणि घरात काहूर माजत. सुमित्रा आजी देवाला साकड घालू लागतात आणि माया तर वाजून सगळ्यांना घट झाला आता आजोबांच्या प्रॉपर्टीत अजून एक आला आता आमच्या वाट्याला काही येणार नाही म्हणतात. शेवटी कळतं तो चुकीच्या ऍड्रेस वर आला होता. आणि चुकीच्या बदलामुळे इथे पोहोचला होता.
EP 2 :
चिंटू च्या डोक्यावर कुंडी पडते आणि तो म्हणू लागतो मी कोण आहे कुठे आहे सगळे जन त्यांला आठवणी सांगू लागतात पण शेवटी त्याने मोबाईल गेम च्या नादात पैसे हरले आणि भीतीने त्याने हा ड्रामा केला होता हे कळतं
EP 3 :
मॅंडी ताई आपल्या कॉलेजच्या चिनुच्या प्रेमात पडतात आणि त्या उथळ प्रेमाला त्या लग्नात बदलू पाहतायत रघुवीर रावांच्या जीवाला घोर लागतो. मग चिंटू आणि बेंजो आणि फॅमिली मिळून तीच प्रेम नसून फक्त तिचा गैरसमज आणि अल्लड पना असल्याचं जाणीव करून देतात आणि ती स्वतःच्या मुर्खपणावर हसते. आणी चिनूला उडवुन लावते.
EP 4 :
रघुवीर राव यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती घरात येतो आणि घरची मंडळी बुचकळ्यात पडतात. आणि मग काय तिकडं लाऊन रघुवीर स्वतःला करतात
Ep 5:
Jcb खुदाई मध्ये सोन्याचा हंडा सापडतो आणि शेजारी सगळे तुटून पडतात आणि आपला हक्क सांगतात रघुवीर राव कसा त्याचा निकाल लावतात आणि चिन्मय आजोबांचं काय म्हणणं असतं.
EP 5 : मंडी घरी रडत येते खूप तमाशा करते घर डोक्यावर घेते तीची अवस्था बघून सगळ्यांना वाटत तिच्यासोबत काहीतरी अघटीत घडलय पण शेवटी कळतं ती ज्या पार्टीला गेली होती तिथे कुणीही तिच्याकडे ढुंकून ना पाहिल्याने ती अपसेट असते
Ep 7 : माया च्या पोटात दुखु लागत सासू ला वाटत परत एकदा आई होणार ती आणि इतर सगळे तिला taunt मारतात मुल पण म्हणतात ह्या वयात आई बाबांकडे पण disgust पाहतायत आणि शेवटी डॉक्टर आल्यावर कळतं फक्त गॅस होता पोटात.
Ep 8 : चिन्मय आजोबांचं भाऊ येतो कोकणातून आणि त्याच्या वावर्मुळे घरातले सगळे वैतागतात आणि शेवटी जाताना तो बऱ्याच भेटी देऊन जातो ज्याने घरातल्या मुलांना चिन्मय आजोबा मोठेपणा माणसाच्या मनात असल्याची शिकवण देतात.
Ep 9 : चिन्मय आजोबा मॅंडी साठी गावावरुन स्थळ घेऊन येतात सगळे ती अजून लहान असल्याचं दाखला देतात पण आजोबा ठाम असतात माझ्या मित्राच स्थळ आहे मी सांगेन तेच होणार आणि रघुवीर आणि काका त्याच खोटं सिक्का असणं शोधून काढतात आजोबा पण मान्य करतात पण आपली मंद मॅंडी प्रेमात पण पडते आणि मग तिला मनवण्याची कसरत सुरू होते.
Ep 10 :
आजोबा मरणासन्न आहेत असे वाटत सारं घर चिंताग्रस्त होता जो तो त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यामागे लागतात आणि चिन्मय आजोबा माझी वसिहत मी कुणाला देणार गप्पा करतात ज्यामुळे सगळ्यांना त्यांची प्रॉपर्टी मध्ये इंटरेस्ट निर्माण होतो आणि शेवटी कळतं आजोबांना काही झालंच नसत त्यादिवशी गॉसिप ना ऐकल्याने त्यांची मनस्थिती खूप sad होते आणि त्यांना वाटू लागतं आपल्याला काही झालय.
Comments
Post a Comment