रणधुमाळी
Randhumali
ही कहानी जुन्नर तालुक्यातील उच्च समाजातील दोन घराण्यातील उच्च कोटीच्या वादातुन जन्माला आली.
कहानीची मुळ पात्र
मांडवी नदीच्या किनार्या लगत आप्पा साहेब घुले पाटील राहणार वरची आळी जुन्नर तालुका शिवनेरीच्या पायथ्याशी त्यांच्या सौ जिजा आई घुले पाटील
दोघांना दोन मुलगे एक मुलगी थोरले बंधु सार्थक दादा साखर कारखाण्याची धुरा आणी आप्पा साहेबांच्या राजकीय वारसाचे प्रबळ दावेदार , संग्राम दादा शेती, काॅलेजच्या राजनिती मध्ये अग्रगणी. गायत्री ताई प्रेम हेच जिवन माननार्या वडिलांच्या गळ्यातला ताईत भावांचा जीव की प्राण आणी तळहातचा फोड. वडिलांचा एकही शब्द न पडु देणार्या ताई साहेब वडिलांचे कट्टर वैरी आणी राजकीय हितशत्रू असलेल्या रावसाहेबांच्या थोरल्या मुलाच्या प्रेमात घरदार सोडुन वडिलांच्या इभ्रतिची पर्वा न करता पळुन जाऊन लग्न करते. आप्पा साहेबांच्या राजकिय वर्तुळात भुकंप उठतो. सुत्र हलू लागतात. आप्पा साहेबांना हार पचनी पडत नसते. आपली इज्जत दुश्मनाच्या दाराशी गहान पाहुन तिळपापड होत असताना संग्राम दादा दुश्मनाच्या गोटात जाऊन ताईच्या नातेसंबंधा मध्ये जाऊन आपल्या वैरी गटाची दिशा ढाले पाटील या कॉलेज पासुनच्या परंपरागत वैरीणीला
आपल्या जाळ्यात ओढुन आपल्या गायत्री ताईला प्रोटेक्ट करुन वैरात आपला पारड जड करण्याचा प्लान आखतो. त्याच्या ह्या प्लानने अप्पा साहेब सुखावतात.
आणी आखणी नुसार त्यांच्या योजनेला सुरुवात देखील होते. दिशा ढाले पाटील हिला आपल्या प्रेमाचा विश्वास देउन तिला पुर्णपणे आपल्या नादी लावुन तिच्याशी लग्न करुन आपल्या घरी घेऊन येतो.
रावसाहेब ढाले पाटील त्यांची अक्का राधाताई आणी दोन धडाडीचे मुलगे आणी मुलगी दिशाताई. ह्या विवाहाने मंचर चे कट्टर आणी कडवट रावसाहेब तिच्या बाबतीतली घटना पाहुन नरम पडतात त्यांची दुखती नस आप्पा साहेबाच्या हाती पोहोचल्याने ते सर्वच फ्रंट वर एक पाऊल मागे ढकलले जातात.
गायत्री घरात पाऊल ठेवल्यापासुन अप्पा साहेब घुले पाटलांची लेक असल्याचं त्यांचच हरामी वृत्तीच प्रतिक पदोपदी दाखवुन देते. आणी संग्राम च्या घरात जाऊन दिशा आयती विरोधकांच्या सापळ्यात अडकते. घरात मोठी जाऊ , कजाग सासू विरोधी सासरे आणी त्यात भर म्हणुन संग्राम च्या खोट्या चेहर्याचा नकाब फाटुन आपला नवरा देखील आपल्या बाजुने नसल्याने दिशा एकाकी पडते. ह्या सगळ्याची कल्पना करुन कधीही कच न खाणारे रावसाहेब घरातल्या वाढत्या कलहाने आपल्या जावयाची संग्रामची भेट घ्यायची ठरवतात.
ठरल्याप्रमाणे संग्राम आपल्या विजयाचा डंका वाजवत सर्वच बाजुनी मात दिल्याचा जल्लोष साजरा करत रावसाहेबांना
सामोरा येतो आणी जोपर्यंत दिशा घुले पाटिलांची सुन आहे तोपर्यंत आप्पा पाटिलांनी सर्वच बाजुने माघार घेउन आपल्या सर्व अटी मान्य कराव्या हा प्रस्ताव मांडतात.
हे ऐकुन इतका वेळ मौन असलेले रावसाहेब एकच कटाक्ष टाकतात आणी एकच चपराक देतात संग्राम ला तु हे काय केलस लेका मी तुझ्याच घराचा वारसा इतकी वर्ष जपला तु एकाच क्षणात माझचं घर संपवाया निघालास. तु ज्या मुलीशी लग्न केलस आणी जिला वैर्याच्या दावणीला नेउन बांधलस तिच लग्न तुझ्याशी व्हाव ही माझीच काय तुझ्या बाची पण इच्छा होती तस वचनच दिलं होत मी तुझ्या बा ला आमच्या मैत्रीची पावती होत तुमच नातं. पण तु तिच्याशी ज्याप्रकारे प्रतारणा केलीस आणी माझ्या मैत्रीचा अपमान केलास म्हणुन सांगतो .
तुझं आप्पा साहेबांशी असलेल नात खोट आहे तु त्याचा लेक नाहीस तर त्यांचा पुतण्या आहेस माझ्या मैतर श्रीनिवास घुले पाटिलांचा मुलगा आप्पाने सगळीकडे आपल्या थोरल्या मुलाला सार्थक ला पुढे करुन तुझी कायम पिछेहाट करवली तुला रोखुन धरलं इतक्यावर पण तुझ्या लक्षात नाही आलं की आपला बाप आपल्याला का आपल्याला पुढे जाऊ देत नाही . तुझ्या बापाच्या राजकीय यशावर जळफळून आणी कुठलेच चुकीचे प्रोजेक्ट अडवुन धरुन कायम आप्पाची पिछेहाट केली म्हणुनच आप्पाने सोयिस्कर रित्या काटा काढलाय श्री चा आणी त्याच्या ह्या संपत्तीचा एकमेव संपत्तिचा वारस असलेला तु स्वतःच सर्व काही अजाणते पणे दान करुन बसलास . संपत्ती जाऊदे बेहत्तर पण
गावकर्यांची जमिन आणी त्यांचा विश्वास त्याचा पण तू मुर्खपणाने सौदा केलास.
मी स्वतःसाठी नाही तर माझ्या मित्राच्या तुझ्या वडिलांना दिलेल्या एका शब्दासाठी झटलो.
आप्पासाहेबांनी इतके वर्ष गावकर्याना फसवुन गावकर्यांच्या जमिनी लुबाडुन गावाच्या सर्वनाशासाठी कारणीभुत असलेले प्रकल्प एक एक सुरू करण्याचा त्याने धडाका लावलाय त्याला कारणीभुत तू आहेस . तुला काय वाटल माझ्यामुलीने लग्न केल म्हणुन मी तुला भेटलो .. नाही तु केलेल्या आतापर्यंतच्या चुकांची जाणीव तुला करुन द्यायला मी तुला भेटलोय. माझ्या मुलीच प्रारब्ध तेव्हाच मी तुझ्या हवाली केल होत जेव्हा मी तुझ्या बापाला वचन दिलं.
संग्राम हे सगळ ऐकून कानात तेल ओतल्याप्रमाने स्तब्ध होतो त्याचा आपल्या कानावर विश्वास बसत नाही त्याच्या मनाला पटत नाही एका क्षणात त्याच अस्तित्व संपल्यासारख त्याला वाटु लागत . त्याच विश्वच ढवळून निघत . ज्या काकाला आपला बाबा समजत होता आपल सार विश्व समजत होता आपलं आदर्श मानत होता तो अचानक आपला वैरी निघावा
आपल्या वडिलांचा हत्यारा निघावा ह्याची कल्पनाच करवत नव्हती . आपण आपल्या सोबत दिक्षाला सुद्धा नरकात ओढल्याची आणी गावकरांच्या विश्वाससाची प्रताडणा केल्याच संग्रामला जाणवतं आता दिलेले आदेश परतवनंआणी त्यामुळे
होणारी गावाची नुकसाणी थांबवन ह्या शिवाय पर्याय नव्हता. ह्या साठी करावी लागणारी धडपड . आपणच खाल्लेली माती सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न आणी धडपड आता संग्रामला करावा लागणार होता. हा गुंता सोडवणे आणी
आता स्वताच अस्तित्व दिशा आणी संपुर्ण गावाची जबाबदारीने संग्राम हादरुन गेला
कसा असेल संग्राम दिशाचा पुढिल प्रवास?
आप्पासाहेब निवांत बसतील का ?
इतक्या अथक प्रयत्नांनी मिळवलेली सत्ता जाऊ देतील का?
रावसाहेबांचा पुढील डावपेच काय असेल?
काय असेल
ह्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहत राहा रणधुमाळी
Comments
Post a Comment